ट्रोजन युद्ध
ट्रोजन युद्ध : ग्रीस व ट्रॉय ( ग्रीक व ट्रोजन) यांत पारंपरिक इतिहासानुसार इ. स. पू. सु. ११९३–११८४ ह्या दरम्यान झालेले युद्ध. ह्या युद्धाचे सविस्तर व मनोरंजक वर्णन होमरच्या इलिअड ह्या महाकाव्यात आलेले असून ग्रीक पौराणिक कथांत ह्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले.